जी २० देशांमधील पर्यटक आणि व्यापारी यांना भारतात युपीआय पेमेंटची सुविधा


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची चलनव्यवस्था आंतरराष्ट्रीय समुदायाशी जोडून घेण्याचा प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून युपीआय पेमेंटची सुविधा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने आखली आहे. UPI payment facility in India for tourists and merchants in G20 countries

या योजनेतले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जी २० देशांमधील पर्यटक आणि व्यापारी यांना युपीआय पेमेंट व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हा निर्णय आज जाहीर केला आहे. सुरवातीला ही योजना भारतातल्या निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उपलब्ध करून देण्यात येऊन नंतर तिचा विस्तार केला जाईल, असे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सीचा प्रयोग देशात आधीच सुरू केला आहेच. त्याचाही विस्तार करून ती सर्वसामान्यांच्या वापरात येईल, याची व्यवस्था करण्याचा मनोदय शक्तिकांत दास यांनी बोलून दाखविला. परदेशी नागरिकांना भारतात युपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देणे हे त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचे स्पष्ट होत आहे.

UPI payment facility in India for tourists and merchants in G20 countries

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात