मृत्यू झाल्यावर सात दिवसांन विजय जाहीर होण्याचा दुर्दैवी प्रकार तृणमूल कॉंग्रेसचे खारदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या बाबत घडला आहे. उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या खारदा विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा विजयी झाल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच म्हणजे २५ एप्रिल रोजी काजल सिन्हा यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.Unfortunately for the Trinamool MLA, his victory was declared seven days after his death
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : मृत्यू झाल्यावर सात दिवसांन विजय जाहीर होण्याचा दुर्दैवी प्रकार तृणमूल कॉंग्रेसचे खारदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या बाबत घडला आहे.
उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या खारदा विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा विजयी झाल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच म्हणजे २५ एप्रिल रोजी काजल सिन्हा यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.
‘दिवंगत’ काजल सिन्हा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांला २८,०४१ मतांच्या फरकानं मात दिल्याचं रविवारी समोर आलं होतं. परंतु, दु:खद म्हणजे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काजल सिन्हा मात्र या जगात नाहीत
.करोना संक्रमणामुळे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काजल सिन्हा हे २१ एप्रिल रोजी करोना संक्रमित आढळले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.काजल सिन्हा यांच्या मृत्यूमुळे खारदा मतदारसंघातील रिक्त जागेवर आता पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App