पश्चिम बंगालमध्ये विकासाचा असाही वेग, तृणमूलच्या आमदाराची संपत्ती पाच वर्षांत १९८५ टक्यांनी वाढली

पश्चिम बंगालमध्ये विकास होत नाही असा विरोधकांचा आरोप तृणमूल कॉग्रेसच्या एका आमदाराने खोटा ठरविला आहे. एका आमदाराची संपत्ती पाच वर्षांत तब्बल १९८५ टक्यांनी वाढली आहे.Wealth of Trinamool MLAs increased by 1985 per cent in five years.


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विकास होत नाही असा विरोधकांचा आरोप तृणमूल कॉग्रेसच्या एका आमदाराने खोटा ठरविला आहे. एका आमदाराची संपत्ती पाच वर्षांत तब्बल १९८५ टक्यांनी वाढली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

ज्योत्स्ना मंडी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, २०१६ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १ लाख ९६ हजार ६३३ रुपये इतकी होती. २०२१ मध्ये ही संपत्ती ३९ लाख ४ हजार ५११ ने वाढली असून ४१ लाख १ हजार १४४ वर पोहोचली आहे.ज्योत्स्ना मंडी बंकुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. २७ मार्चला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या ३० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचा एकत्रित सर्व्हे करण्यात आला.

यावेळी २०१६ मध्ये पुरुलियामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून विजय मिळवणारे आणि सध्या भाजपात प्रवेश करणारे संदीप कुमार मुखर्जी यांची संपत्ती २८८.८६ टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे.

संदीप कुमार मुखर्जी यांनी पाच वर्षांपूर्वी आपली एकूण संपत्ती ११ लाख ५७ हजार ९४५ इतकी असल्याचं सांगितलं होतं. ही संपत्ती २०२१ मध्ये ४५ लाख २ हजार ७८२ इतकी झाली आहे. याशिवाय अनेक उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

Wealth of Trinamool MLAs increased by 1985 per cent in five years.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*