आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एका दिवसाच्या दिलाशानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ७६ ते ८४ पैशांनी वाढला आहे, तर डिझेलचा दरही ७६ वरून ८५ पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. Today again petrol and diesel price hike

दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९७.८१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.०७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर ११२.५१ रुपये तर डिझेलचा दर ९६.७० रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०७ .१८ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९२.२२ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल १०३.६७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३३.७१ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.



या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांवर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

या पॅरामीटर्सच्या आधारे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून ते ग्राहकांना किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.

Today again petrol and diesel price hike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात