सासऱ्याचे ५० वर्षांचे राजकारण संपविण्यासाठी सून मैदानात, प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात सून डॉ. दिव्या राणे लढणार


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे गेल्या पन्नास वर्षांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांच्या सूनबाई डॉ. दिव्या राणे मैदानात उतरल्या आहेत. पर्ये मतदारसंघात सून विरुध्द सासरा अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, आता प्रतापसिंह राणेच या मतदारसंघात उभे राहतील की नाही अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.to end 50 years of politics of father-in-law, daughter-in-law against Pratap Singh Rane, Divya Rane will fight

गेली पाच दशके सलगपणे विधानसभेत असलेले प्रतापसिंह राणे या विधानसभा निवडणुकीपासून राजकीय निवृत्ती स्वीकारणार अशी चर्चा होती. कार्यकर्त्यांनी मला निवडणुकीला उभे राहा, असा आग्रह केला आणि मी निवडणुकीला उभा राहणार आहे, असे ते म्हणाले होते.



मात्र, त्यांचे पुत्र आणि गोव्याचे भाजपचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी निवडणूक लढवून रणांगणात पराभूत होण्यापेक्षा वडिलांनी सन्मानाने बाजूला व्हावे, अशी विनंती केली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे ते निवडणूक लढवू, असे सांगत आहेत. गेली वीस वर्षे मीच त्यांना निवडून आणत होतो, असेही त्यांनी म्हटले होते.

भारतीय जनता पक्षाने गुरूवारी आपल्या उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली. पर्ये मतदार संघात विश्वजीत राणे यांच्या पत्नी डॉ दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.डॉ दिव्या राणे यांनी पर्ये मतदारसंघात पूर्वीपासूनच कार्यरत झाल्या आहेत.

जाहीर सभा तसेच कोपरा बैठका घेऊन त्यांनी मतदारा पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मतदारसंघातील लोकप्रिय नेत्या म्हणून गणल्या जात आहे. त्यांच्या उमेदवारीचे मतदारसंघात स्वागत केले जात आहेत.

मात्र, डॉ. दिव्या राणेच विरोधात लढत असल्याने प्रतपसिंह राणे येथून लढणार का? अस सवाल आहे. राणे लढले किंवा नाही लढले तरी त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट होणार असल्याची चर्चा गोव्याच्या राजकारणात आहे.

to end 50 years of politics of father-in-law, daughter-in-law against Pratap Singh Rane, Divya Rane will fight

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात