आम्ही देखील लाखो रुपये कमावू शकलो असतो… जे जे हाॅस्पिटलमधील कंत्राटी डॉक्टरांनी मांडली व्यथा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आम्ही देखील खाजगी रुग्णालयात लाखो रुपये कमावू शकलो असतो किंवा इतर राज्यात जाऊन सेवा देऊ शकलो असतो पण आपल्या मातीची, आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून मागील कित्येक वर्ष आम्ही कंत्राटी पदावर काम करत आहोत We too could have made millions of rupees …The pain caused by the contract doctor at JJ Hospital

ते फक्त सरकारने वेळोवेळी आम्हाला दिलेल्या समावेश करण्यात येईल या आश्वासनाच्या भरवशावर. पण आता आमच्या संयमाची सीमा संपत आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून आज आम्ही सगळे इथे जमा झालो आहोत आणि हे साखळी उपोषण करत आहोत…



सरकारी रुग्णालयातील कंत्राटी डाॅक्टरांनी अशा शब्दात व्यथा मांडल्या. जे जे रुग्णालयात सोमवार पासून समावेशनच्या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या महाराष्ट्रातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी कँडल मार्च काढला.

अनिश्चिततेचा अंधकार दूर व्हावा व लवकरात लवकर आमचा शासनात समावेश करून मागण्यांना न्याय मिळावा असे मत वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केले. मागील पाच पेक्षा अधिक वर्ष आम्ही या रुग्णालयात सेवा देत आहोत. लाखो रुग्णांचे प्राण वाचवत आहोत. हजारो विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. शैक्षणिक कामकाजाबरोबर इतर अनेक प्रशासकीय काम करत आहोत. अनेक कॅम्पच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आहोत तरीपण आम्ही आमच्या अधिकारापासून वंचित आहोत अशी खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.

आम्हाला देखील म्हातारे आई वडील, लहान मुले आहेत पण दरवर्षी आम्हाला १ दिवसाचा खंड दिला जातो, किंवा कित्येक जणांना ४ महिन्याच्या ऑर्डर वर काम करत असताना पुढची ऑर्डर वेळेवर निघेल की नाही ही अनिश्चितता सतत भेडसावत असते. पण आमच्या आंदोलनाची सरकार दरबारी साधी दखल सुद्धा घेतली जात नाही हे खूप विदारक आहे, असे मत डॉ. प्राजक्ता थेटे यांनी व्यक्त केले.

“समावेशन झालेच पाहिजे’ “कोविड योद्ध्यांना न्याय द्या’ “अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करा” या नाऱ्यांनी कदाचित झोपलेले सरकार जागे होऊन आमच्या मागण्या मान्य करेल असे मत डॉ. अमित ह्यांनी व्यक्त केले. काल याच डॉक्टरांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच चालू राहणार असे ह्या कँडल मार्चच्या वेळी सांगण्यात आले.

We too could have made millions of rupees …The pain caused by the contract doctor at JJ Hospital

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!