सरकारी यंत्रणात भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा


विशेष प्रतिनिधी

तेहरान: भ्रष्टाचाराला विरोध केल्याच्या रागातून इराणमध्ये एका चँपियन बॉक्सरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला मृ्त्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.Death penalty for allegation of corruption in government

इराणच्या या अजब कृतीचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. जागतिक पातळीवर निषेष व्यक्त करण्यात येत आहे. इराणचा लोकप्रिय चँपियन बॉक्सर मोहम्मद जवादनं सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आक्षेप घेतल्यानंतर त्याच्यावर खटला भरून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.



2019 साली सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात झालेल्या आंदोलनात बॉक्सर मोहम्मद जवादनं सहभाग घेतला होता. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये नाविद अफकारी नावाच्या एका पैलवानालाही सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मसीद अलिनेजाद यांनी एक ट्विट करत या प्रकरणाची माहिती समोर आणली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या एका आंदोलनासाठी एका खेळाडूला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद जवाद हा एक राष्ट्रीय चँपियन आहे.

Death penalty for allegation of corruption in government

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!