कॉँग्रेससाठी गोवा पैसे कमाविण्याची फॅक्टरी तर तृणमूल येथे सुटकेस घेऊन आलीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

पणजी: काँग्रेससाठी गोवा पैसे कमवण्याची फॅक्टरी आहे तर तृणमूल कॉँग्रेस सुटकेस घेऊन गोव्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आप केवळ खोटे बोलत असून लोक या पक्षाला नाकारत असल्याचेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis alleges that Goa is a factory to make money for Congress, while it has brought suitcases to Trinamool.

पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, इतर पक्ष केवळ भाजपशी संघर्ष करत आहेत. या पक्षांचा इतिहास पाहा. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलं. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात काँग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्यांना सत्ता केवळ यासाठी हवी.



केवळ लुटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवं आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासहार्यता संपल्याचा संपली आहे.

तृणमूल कॉँग्रेसवर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, तृणमूल गोव्यात आली. त्यांनी एमजीपीसोबत आघाडी केली आहे. मात्र त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केले आहे त्याला गोव्याने नाकारलं आहे. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवशावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे.

गोवा एक मार्केट आहे आणि येथील नेते विक्रीसाठी आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही, पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही.

त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत. काही एमपीजीपी नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.फडणवीस म्हणाले की, गोव्यात आप आली आहे. आप केवळ सकाळापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहे.

लोक या पक्षांना नाकारत आहे. दिल्लीत परिस्थिती काय आहे हे लोकांनी पाहिलं आहे. जगमगाती बिजली का नारा, असं केजरीवाल म्हणाले होते. पण वीज मिळाली नाही. इथे वारंवार बत्तीगुल होत आहे. लोकांना सबसिडी मिळत नाही. दिल्लीत पाणीपुरवठ्याची समस्या आहे. आश्वासन देऊनही त्यांनी पूर्ण केलं नाही. हर घर नल, ही मोदीची योजना त्यांनी अंमलात आणली.

त्यात केजरीवाल सरकारचं योगदान नाही. मोहल्ला क्लिनिकचा गवगवा केला. त्यातील निश्चित आकडेवारी त्यांना गाठता आली नाही. मार्चमध्ये 220 मोहल्ला क्लिनिक बंद होते. कोरोना काळात या मोहल्ला क्लिनिकचा काहीच फायदा झाला नाही. गोव्यात आपने अनेक आश्वासने दिले. लोकांना त्यांचं सत्य माहीत आहे.

Devendra Fadnavis alleges that Goa is a factory to make money for Congress, while it has brought suitcases to Trinamool.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात