प्रियंका गांधी म्हणाल्या, मुलांचा गृहपाठ घेण्यासाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागते


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अजूनही मी मुलांचा गृहपाठ घेते. नियवडणूक प्रचारावरून आल्यावर कधी कधी पहाटे चार वाजेपर्यंत जागून गृहपाठ पूर्ण करते, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सांगितले.
प्रियंका गांधी यांनी नुकतेच एक फेसबुक लाईव्ह सत्र आयोजित केले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावरील प्रश्नांनाही उत्तरे दिली.Priyanka Gandhi said that at four in the morning she take homework for her children

एकाने विचारले की तुम्ही मुलांना त्यांच्या गृहपाठात कधी मदत केली आहे का? त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या मुलांना आजही त्यांच्या गृहपाठात मदत करते. माझ्या मुलीने आज सकाळीच तिची एक असाइनमेंट तपासायला सांगण्यासाठी फोन केला होता. केवळ माझ्या मुलांनाच नव्हे तर त्यांच्या मित्रांनाही गृहपाठासाठी मदत करते.



ज्या आंटींकडे मुलं मदतीसाठी यायची त्यातली मी एक होती. कधी कधी मी दिवसभर निवडणूक प्रचार करत असे आणि नंतर पहाटे 4 वाजेपर्यंत माझ्या मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करायचे.आई सोनिया गांधींनी त्यांना काय टोपणनाव दिले आहे, असे विचारले असता,

प्रियंका म्हणाल्या, ती प्रेमाने ‘प्री’ म्हणते पण जेव्हा ती रागावते तेव्हा ती ‘प्रियांका’ म्हणते. राहुल गांधी आणि त्यांच्या भांडण झाले होते का? या प्रश्नावर प्रियंका म्हणाल्या आम्ही खूप भांडायचो. पण बहुतेक वेळा राहू जिंकायचा. माझ्या आजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा मी १२ वर्षांची होते. हत्येनंतर आम्ही शाळेत जाऊ शकलो नाही.

वयाच्या 12 व्या वर्षापासून ते 18 व्या वर्षी मी घरूनच अभ्यास केला आणि परीक्षा दिली. आमचा इतर मुलांशी होणारा संवाद बंद झाला. राहुल आणि मी एकटेच राहायचो कारण माझे वडील खूप प्रवास करायचे आणि आमची आई सोबत असायची.

या एकटेपणात आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली पण खूप भांडणही झाली. मात्र, जेव्हा जेव्हा कोणी बाहेरचा माणूस आमच्याशी लढायला यायचा तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध एक व्हायचो. कधीकधी आमची भांडणे सोडविण्यासाठी वडिलांना हस्तक्षेप करावा लागायचा.

Priyanka Gandhi said that at four in the morning she take homework for her children

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!