‘पक्ष’पातापलीकडे : जेव्हा मोदी राजकारणातील पन्नासी साजरे करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे भरभरून कौतुक करतात…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच जे योग्य आहे त्याची दखल घेतात .मग ते विरोधक असले तरीही मोदी त्यांची स्तुती करण्याचे टाळत नाहीत. हेच मोदींचे खास वैशिष्ट्य …

  • गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत निरोप देताना मोदींनी भावना आणि अश्रू आवरणे कठीण झाले होते. नबी यांची आठवण कायम ह्रदयात राहिल असेही ते म्हणाले…

  • मोदींनी केलेली कॉंग्रेस नेत्यांची स्तुती कॉंग्रेस हायकमांडला मात्र रूचत नाही आणि पचतही नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद… PM Narendra Modi congratulates Goa congress leader Pratapsingh Rane for completing 50 years as MLA

विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणे यांनी आमदार म्हणून गोव्याच्या विधिमंडळात ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतापसिंह राणे यांना आज आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

गोव्याच्या प्रगतीसाठीचा त्यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो, अशा शब्दात प्रतापसिंह राणेंचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला आहे.

गोव्याच्या राजकारणामध्ये राणे यांचे नाव मोठे आहे, विशेषत: 80 -90 च्या दशकात ते राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत होते. त्यांनी 6 वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
1980 ते 1985 , 1985 ते 1989 , 1990 मध्ये तीन महीने , 1994 ते 1999 , 2005 मध्ये एक महिन्यासाठी आणि त्यानंतर 2005-07 पर्यंत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. गोव्याच्या विधानसभेनेही प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या.प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, प्रतापसिंह राणेजी आमदार म्हणून ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जनतेची सेवा आणि गोव्याच्या प्रगतीसाठी प्रतापसिंह राणे यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो. मला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असताना केलेल्या चर्चा अजूनही आठवणीत आहेत.

आमदारकीला ५० वर्षें पूर्ण झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा विशेष सत्कार गोवा विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्विट करून प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सावंत यांनी ट्विट करताना लिहिले की, आमदाराच्या रूपात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक कार्य आणि राजकारणामध्ये त्यांचा दीर्घ अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची भावी वाटचाल आणि आरोग्यासाठी शुभेच्छा, असे प्रमोद सावंत म्हणाले.

PM Narendra Modi congratulates Goa congress leader Pratapsingh Rane for completing 50 years as MLA

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*