भारतातील लसीकरणाला मिळणार गती, भारत सरकार फायझरचे पाच कोटी डोस करणार खरेदी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीयांनी लस घेण्यास प्राधान्य देण्यास सुरूवात केल्याने लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारत सरकार फायझरच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच कोटी डोस खरेदी करण्यासाठी तयार करत आहे. त्यामुळे भारतातील लसीकरणाला गती मिळणार आहे.To accelerate vaccination in India Government of India will purchase five crore doses of Pfizer

वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसारअमेरिकेची फार्मा कंपनी आणि जर्मन कंपनी यांनी मिळून कोरोना लस विकसित केली आहे. औषध कंपनीने अद्याप भारतात आपली लस वापरण्याची परवानगी मागितली नाही. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवणारा भारत आतापर्यंत प्रामुख्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडिया बायोटेकच्या लसीद्वारे नागरिकांचे लसीकरण करत आहे. मात्र आता सरकार जॉन्सन अँड जॉन्सनसोबत सुद्धा चर्चा करीत आहे.



जॉन्सन अँड जॉन्सनचा भारतातील बायोलॉजिक ई सोबत ६० कोटी डोस तयार करण्यासाठी उत्पादन करार आहे. गेल्या आठवड्यात देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला भारतात आणीबाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देशात ५ लसी आहेत. एसआयआय, भारत बायोटेक, स्पुतनिक आणि मॉडर्ना यांना सध्या भारतात परवानगी आहे.

To accelerate vaccination in India Government of India will purchase five crore doses of Pfizer

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात