अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येणार दिल्लीसह महाराष्ट्राचाही समावेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वायव्य आणि मध्य भारत या आठवड्यात थंडीची लाट कायम राहील. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, पुढील पाच दिवसांत अनेक राज्यांमध्ये तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली येऊ शकते. There will be cold wave in many states, Including Delhi and Maharashtra IMD

च्या म्हणण्यानुसार, थंडीच्या लाटेमुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात कडाक्याची थंडी जाणवेल.



हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, थंडीचे दिवस किंवा थंडीच्या लाटेचे दिवस असतात जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअसने कमी असते. याशिवाय, कमाल तापमान सामान्यपेक्षा 6.5 अंशांनी कमी असेल तो दिवस तीव्र थंडीचा असतो.

उत्तराखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कडाक्याच्या थंडीचे दिवस ठरू शकतात. पुढील पाच दिवसांत यापैकी काही राज्यांमध्ये थंडीची लाट येऊ शकते, असा अंदाज आहे.

पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये दाट धुके राहील. पुढील दोन ते तीन दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

There will be cold wave in many states, Including Delhi and Maharashtra IMD

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात