गोवा : पणजीमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत बारामतीच्या पाच स्पर्धकांनी मिळवले विजेतेपद , तालुक्याचे नाव उंचावले


किप ऑन रोलिंग क्लबमधील बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे.Goa: Five competitors from Baramati won the title in the skating competition held in Panaji, raised the name of the taluka


विशेष प्रतिनिधी

गोवा : गोव्यामधील पणजी येथे स्केटिंग स्पर्धा पार पडली.राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी बारामतीमधून सात खेळाडू पणजीला गेले होते. तर या सात खेळाडूंपैकी पाच जणांनी यशाच्या शिखरावर धाव घेतली. किप ऑन रोलिंग क्लबमधील बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे.या पाच खेळाडूंची नावे अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे, निशांत आर्डे आणि सिया गांधी आहे.या पाचही खेळाडूंना राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरता बारामती येथील किप ऑन रोलिंग क्लबचे कोच सचिन शहा यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.स्केटिंग स्पर्धेत अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.तर निशांत आर्डे आणि सिया गांधी त्यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

Goa : Five competitors from Baramati won the title in the skating competition held in Panaji, raised the name of the taluka

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था