‘विजेचे संकट नाहीच आणि होणारही नाही’, केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांचे स्पष्टीकरण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान, झारखंड, बिहार, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद होत आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोळशाच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह म्हणाले की, आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. दिल्लीमध्ये आवश्यक प्रमाणात वीज पुरवली जात आहे आणि यापुढेही अशीच राहील. There is no power crisis and there will never be, said Union Minister R K Sinhaकेंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) चे सीएमडी देखील बैठकीत उपस्थित होते. आम्ही त्यांना सांगितले आहे की करार बंद असो वा नसो, गॅस स्टेशनला आवश्यक तेवढाच गॅस तुम्ही द्याल. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, पुरवठा चालू राहील. आधी गॅसची कमतरता नव्हती, भविष्यातही होणार नाही. आर. के. सिंह कोळशाच्या कमतरतेवर म्हणाले की, आज आपल्याकडे चार दिवसांपेक्षा जास्तीचा कोळशाचा सरासरी साठा आहे. आमच्याकडे दररोज स्टॉक आहे. काल वापरल्याप्रमाणे आज कोळशाचा साठा आला आहे.

टाटा पॉवर सीईओला इशारा

केंद्रीय ऊर्जा मंत्री पुढे म्हणाले की, आमच्याकडे पूर्वीप्रमाणे 17 दिवस कोळशाचा साठा नाही, पण 4 दिवसांचा साठा आहे. कोळशाची ही परिस्थिती आहे, कारण आमची मागणी वाढली आहे. आम्ही आयात कमी केली आहे. आपल्याला कोळशाची उत्पादन क्षमता वाढवायची आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. विजेची संकट असल्याची ओरड होत असल्याने स्पष्टीकरण देताना आर.के.सिंह म्हणाले की, ही दहशत विनाकारण निर्माण केली जात आहे. कारण गेलने दिल्लीच्या डिस्कॉम्सला संदेश पाठवला की, ते एक किंवा दोन दिवसांनी बवाना गॅस स्टेशनला गॅस पुरवठा बंद करतील. तो संदेश का पाठवला, कारण त्यांचा करार संपत होता.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह म्हणाले की, मी टाटा पॉवरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की, जर त्यांनी ग्राहकांना निराधार एसएमएस पाठवले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे ग्राहकांमध्ये दहशत निर्माण होऊ शकते. पॉवर प्लांट्समध्ये कोळशाच्या कमतरतेबद्दल काँग्रेस नेत्यांच्या टीकेवर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले, “दुर्दैवाने, कॉंग्रेस पक्षाचे विचार संपले आहेत. त्यांची मते संपत आहेत आणि म्हणूनच त्यांचे विचारही संपत आहेत.”

There is no power crisis and there will never be, said Union Minister R K Sinha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती