नासाला अखेर मिळाला मंगळावरील दगडाचा नमुना! पर्सिव्हरन्स रोव्हरचा प्रयत्न यशस्वी


 

कॅलिफोर्निया – ‘नासा’ने मंगळावर उतरविलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरला या ग्रहाच्या पृष्ठभागावर दगडाचा पहिला नमुना गोळा करण्यात यश आले आहे. त्याची माहिती ट्विटरवरून देताना एक छायाचित्रही पोस्ट केले आहे. एक नळीत मंगळावर आढळलेल्या एका दगडाचा नमुना दिसत आहे.NASA got stone at Mars

पेन्सिलपेक्षा तो थोडा जाड आहे. अशा प्रकारे दगडाचे आणखी नमुने गोळा केल्यानंतर ते सर्व शास्त्रज्ञांच्याद संशोधनासाठी पृथ्वीवर आणले जाणार आहेत.मंगळाच्या पृष्ठभागावरून दगडाचा नमुना उचलल्यानंतर त्याचे मोजमाप घेण्यासाठी व छायाचित्रणासाठी पर्सिव्हरन्सने नलिका रोव्हरच्या अंतर्गत भागात पाठविला व नंतर हवाबंद भागात सील केला. 

‘‘ हे अत्यंत महत्त्वपूर्ण यश आहे. पर्सिव्हरन्सने आणि आमच्याव चमूने लावलेला हा शोध पाहण्यासाठी मी अधीर झालो आहे,’ असे उद्‍गार ‘नासा’चे प्रशासकीय अधिकारी बिल नेल्सन यांनी काढले. सहा महिन्यांपूर्वी पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील दगडाचा नमुना गोळा करण्याचा प्रयत्न केला होता.

या सर्व उपकरणे कार्यरत असूनही पर्सिव्हरन्सच्या नलिकेत नमुना पोहचू शकला नव्हता. यानंतर ‘नासा’ने दुसऱ्या जागेवरून दगडाचा नमुना गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर जेझिरो विवराजवळील नमुना गोळा करण्यात यश आले आहे.

NASA got stone at Mars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”