काश्मीर टार्गेट किलिंग : दहशतवादाचा दिवा विझताना जास्त फडफडतोय; राज्यपाल मनोज सिन्हांचे शरसंधान


वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्मीरमध्ये विक्रमी संख्येने पर्यटक येणे, अर्थव्यवस्था वाढणे हे फुटीरतावाद्यांच्या पचनी पडत नाही. त्यातून टार्गेटेड किलिंग होतात. पण सुरक्षा दले फुटीरतावाद्यांना मोडून काढतील. दहशतवादाचा दिवा विजताना जास्त फडफडतोय, अशा शब्दात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या टार्गेटेड किलिंग वर भाष्य केले आहे. The lamp of terrorism flickers more and more when it goes out; Governor Manoj Sinha’s Sharasandhan

काश्मीर मध्ये होत असलेले हिंदूंचे शिरकाण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे तरी देखील हे दोन बडे नेते एका शब्दानेही बोललेले नाहीत. अमित शहा यांनी दोनच दिवसांपूर्वी अतिवरिष्ठ पातळीवरची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्यासह मनोज सिन्हा देखील उपस्थित होते. त्यानंतर प्रथमच प्रशासनाच्या वतीने उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी वर उल्लेख केलेले भाष्य केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात विक्रमी संख्येने पर्यटक आले आहेत. विक्रमी संख्येने अमरनाथ यात्रेची नोंदणी होत आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण होत आहेत. जम्मू कश्मीर मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गुंतवणुकीचे करार झाले आहेत केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जनतेच्या मानसिकतेत संपूर्ण सकारात्मक बदल होत आहे. हे सकारात्मक वातावरण दहशतवाद्यांना आणि त्यांना फूस लावणाऱ्या परकीय शक्तींना सहन होईनासे झाले आहे. त्यांना राज्यात पुन्हा 1990 च्या दशकातल्या जुने दिवस आणायचे आहेत जनतेला दहशतीखाली जीवन जगायला लावायचे आहे. म्हणून टार्गेटेड किलिंग होत आहेत, असे मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.

त्याच वेळी त्यांनी विझणाऱ्या दिव्याचे उदाहरणे दिले आहे. दिवा विझताना नेहमी मोठा होतो. जास्त फडफड करतो आणि नंतर विझून जातो, अशा शब्दात त्यांनी दहशतवाद्यांवर आणि फुटीरतावाद्यांवर शरसंधान साधले आहे.

The lamp of terrorism flickers more and more when it goes out; Governor Manoj Sinha’s Sharasandhan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात