The Kashmir Files : सिनेमा अरबस्तानात होणार प्रदर्शित, पण भारतात प्रदर्शनाला शरद पवारांचा विरोध!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा “द काश्‍मीर फाईल्स” हा अरबस्थानात प्रदर्शित होणार आहे. पण भारतात मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगीच द्यायला नको होती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात ते बोलत होते. The Kashmir Files: Cinema to be screened in Arabia, but Sharad Pawar opposes screening in India !!

“द काश्मीर फाईल्स” या सिनेमावर शरद पवार यांनी आधी देखील टीका केली आहे. त्याच टीकेचा पुढचा भाग शरद पवार यांनी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात काढला. “द काश्मीर फाईल्स” सिनेमामुळे दोन समाजांमध्ये दरी निर्माण होत आहे. काश्मीरमधून हिंदूंना आपले घर सोडावे लागले हे खरे आहे, पण मुस्लिमांवर देखील अत्याचार झाले आहेत. सिनेमात एकतर्फी हिंसाचार दाखवला आहे. त्यामुळे “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा प्रदर्शित करायला परवानगीच द्यायला नको होती, असे शरसंधान शरद पवारांनी साधले.

– पवारांचा विरोध का?

“द काश्मीर फाईल्स” सिनेमामुळे राज्यातील फारूख अब्दुलांच्या राजवटीपासूनचा खरा इतिहास बाहेर आला. हिंदू नरसंहाराची राजकीय पार्श्वभूमी कशी तयार करण्यात आली याची चर्चा सुरू झाली. फारूख अब्दुल्ला घराण्याचे शरद पवारांच्या घराण्याचे संबंध आहेत. अब्दुल्ला कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळेच पवार अस्वस्थ झाले आहेत. “द काश्मीर फाईल्स” सिनेमा वर टीका करताना त्यांनी पवारांनी अल्पसंख्यांक मेळाव्याचे ठिकाण निवडले आहे. यातूनच बऱ्याच राजकीय गोष्टींचे सूचन होते आहे.

– इस्लामच्या जन्मभूमीत सिनेमा प्रदर्शन

पण शरद पवारांनी जरी भारतात द काश्मीर फाइल्स हा सिनेमा प्रदर्शित होण्याची परवानगी द्यायला नको होती असे वक्तव्य केले असले तरी प्रत्यक्षात संयुक्त अरब अमिराती मध्ये अर्थात अरबस्तानात हा सिनेमा कोणत्याही काटछाटी विना अर्थात “अनकट” प्रदर्शित होतो आहे. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. संयुक्त अरब अमिराती च्या सेन्सॉर बोर्डाने या प्रदर्शनास परवानगी दिली आहे असे अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. अरबस्ताना सारख्या 100 % मुस्लिम देशात हा सिनेमा प्रदर्शित होणे याला फार महत्त्व आहे. कारण हिंदू नरसंहाराची खरी कहाणी इस्लामच्या जन्मभूमी प्रदर्शित होणे याला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या फार महत्त्व आहे.

The Kashmir Files : Cinema to be screened in Arabia, but Sharad Pawar opposes screening in India !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात