ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन होत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे महामंडळ कार्यान्वित होईल. State level office of ‘Ustod Kamgar Kalyan Mahamandal’ inaugurated in Pune on Sunday

ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र दिले जाणार आहेत. पुणे येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय साकारले आहे. अनेक वर्ष कागद व घोषणांवर राहिलेल्या महामंडळाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मूर्त स्वरूप दिले आहे.



गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विधानपरिषद उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्ता भरणे, सुप्रिया सुळे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

State level office of ‘Ustod Kamgar Kalyan Mahamandal’ inaugurated in Pune on Sunday

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात