पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक


पुणे जिल्ह्यात आणि शहरात वाढते अपघात बघता पुण्यात पुन्हा हेल्मेट घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार सर्वांना हेल्मेट घालने बंधनकारक करण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे –जिल्ह्यात आणि शहरात वाढते अपघात बघता पुण्यात पुन्हा हेल्मेट घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार सर्वांना हेल्मेट घालने बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्हाधिका-यांच्या या निर्णयालाआता पुणेकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.Pune District collector order Helmet mandary rule to government offices, school and college

वाहन अपघातात दगावणा-या व्यक्तिंमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, सायकलस्वार अथवा पादचारी असतात. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू होण्याचा धोका हा सात पट जास्त असतो. जितके दुचाकी चालक अपघातात दगावात त्यापैकी सर्वात जास्त मृत्यू हे डोक्याला मार लागल्याने होतात.



मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोठेही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणा-या तसेच पाठीमागे बसणा-राया व्यक्तीला हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेट परिधान केल्यास अपघातात वाचण्याची शक्यता ही ८० टक्कयांनी वाढते.

या मुळे शासकीय कर्मचारी, शाळा महाविदद्यालयात जाणारे शिषक, विदद्यार्थी, कर्मचारी यांना हेल्मेट घालने बंधनकारक करण्यात येत आहे. जी व्यक्ती या आदेशाचे पालन करणार नाही त्यांना मोटार वाहन १९८८ च्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

पुणे करांची प्रतिक्रीया पाहणे ठरणार औत्सूक्याचे

पुण्यात या आधीही अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेट सक्तीला विरोध करत ही सक्ती पुणेकरांनी हाणून पाडली आहे. प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीही स्थापन करण्यात आली होती. हेल्मेटपेषा पुणेरी पगडी बरी अशा उपरोधिक गोष्टीही पुणेकारांनी हेल्मेटसक्ती विरोधात केल्या होत्या. आता पुन्हा हेल्मेटसक्ती करण्यात आली असल्याने पुणेकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune District collector order Helmet mandary rule to government offices, school and college

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात