बायकोला जगभर फिरवून आणणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा मृत्यू, पर्यटनाची आवड पाहून आनंद महिंद्रांनीही केली होती मदत


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत या जोडप्याने 26 देशांना भेट दिली होती.The death of a tea vendor in Kerala who took his wife around the world, Anand Mahindra also helped by seeing the love of tourism

एर्नाकुलम येथील चहाविक्रेते विजयन आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रसंगी कर्ज काढून पत्नीसह जगातील विविध देशांना भेट देत होते. त्यांची पर्यटनाची आवड पाहून अनेकांनी त्यांना मदतही केली. उद्योगपती आनंद महिंद्रा सारखे प्रायोजक मिळू लागले.



2019 मध्ये सोशल मीडियावरून त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यावर महिंद्रा यांनी त्यांची ऑस्ट्रेलियाची भेट प्रायोजित केली होती. रशियाचा शेवटचा प्रवास 21 ऑक्टोबर रोजी होता आणि ते 28 ऑक्टोबर रोजी परतले होते.

प्रसिध्द लेखक एन. एस. माधवन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की विजयन यांच्याशी आठवड्यातून किमान दोन वेळा भेट व्हायची. त्यांच्याकडून प्रवासाच्या कथा ऐकणे एक आनंद होता. ते नुकतेच रशियाहून परतले होते. त्यांना पुतीन यांना भेटण्याची इच्छा होती.

The death of a tea vendor in Kerala who took his wife around the world, Anand Mahindra also helped by seeing the love of tourism

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात