राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये समन्वय हवा, अमित शहा यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : नक्षलवादी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वयाची गरज असल्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.Coordination between state police and central agencies is needed, appeals Amit Shah

लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात राज्यांचे पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय 56 व्या परिषदेचे उद्घाटन करताना शहा बोलत होते. कोविड-19 साथीच्या काळात सुरक्षा दलांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.



देशपातळीवर उत्कृष्ठ कामगिरीसाठी नवी दिल्लीच्या सदर बाजार पोलिस स्टेशन, ओडिशातील गंगापूर पोलिस स्टेशन आणि हरियाणातील भट्टू कलान पोलिस ठाण्यांना गौरविण्यात आले. अमित शहा शहा म्हणाले, सागरी किनारी सुरक्षा, वामपंथी अतिरेक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि सीमा क्षेत्र व्यवस्थापन यासह सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

त्यासाठी राज्यातील पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय हवा. कट्टरतावादामुळे निर्माण झालेली आव्हाने परतून लावण्यासाठी हे गरज आहे.ही परिषद हायब्रीड पद्धतीने आयोजित केली जात आहे.

लखनौ येथील यूपी पोलिस मुख्यालयात पुढील दोन दिवस सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहतील. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कइ कार्यालयांमधून व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे 350 इतर अधिकारी यात उपस्थित राहतील.

Coordination between state police and central agencies is needed, appeals Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात