कृषी कायदे रद्द मोंदींकडून; श्रेय घ्यायला काँग्रेस पुढे; पंजाबमध्ये उभारणार शेतकरी आंदोलनाचे स्मारक!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काम कार्तिक पौर्णिमा प्रकाश पर्व याचे निमित्त साधून घोषणा केली. त्यासाठी आंदोलन शेतकरी आंदोलकांनी केले. पण त्याचे श्रेय घ्यायला काँग्रेस आता पुढे सरसावली आहे. काँग्रेस आज देशभर शेतकरी विजय दिवस साजरा करत आहे. पण त्याचबरोबर पंजाब मधल्या काँग्रेस सरकारने राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.Repeal of agricultural laws; Congress to take credit; Monument of farmers’ movement to be erected in Punjab

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचेएवढे मोठे आंदोलन प्रथमच घडले आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलकांचे स्मारक राज्य सरकार पंजाब मध्ये उभारणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली आहे.श्रेया कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही… पण

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या आंदोलनावरून देशात मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद झाले. आंदोलनाच्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाने येऊ नये, अशी भूमिका भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी घेऊन ती कायम ठेवली.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केले. या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापले असून त्यामध्ये काँग्रेसने वेगळ्या प्रकारे उडी घेतली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना शेतकरी आंदोलनात सातशे जणांचे बळी गेले त्याचा हिशेब कोण देणार?, असा सवाल केला आहे.

कृषी कायदे रद्द केल्याचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली असून पक्ष आज देशभर शेतकरी विजय दिवस साजरा करत आहे. काँग्रेस मुख्यालयातून सर्व प्रदेश कार्यालयांना यासंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभरातील शहरांमध्ये, गावांमध्ये जाऊन शेतकरी विजयी मेळावे घ्यावेत. शेतकरी विजयी रॅली काढाव्यात आणि शेतकरी विजय दिवस साजरा करावा, असे आदेश काँग्रेस मुख्यालयाने दिले आहेत.

कृषी कायदे रद्द करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील सर्व विरोधी पक्षांना फटकारले आहे. कृषी कायदे रद्द झाले याचे श्रेय फक्त शेतकरी आंदोलकांचे आहे. विरोधी पक्षांचे अजिबात नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस मात्र या प्रतिक्रियांना टाळून स्वतः पुढाकार घेत देशभर शेतकरी विजय दिवस साजरा करत आहे.

Repeal of agricultural laws; Congress to take credit; Monument of farmers’ movement to be erected in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण