कोल्हापूर डेपोट मधील निलंबित 5 एसटी कर्मचाऱ्यांची जमसमाधी घेण्याची तयारी ; एमएसआरटीसी वर्कर्स असोसिएशनचे हेड उत्तम पाटील


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्रमधील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. हा संप चालू होऊन 11 दिवस पूर्ण झालेले आहेत. कोल्हापूर बस डेपोमधील एकूण 53 कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांनी पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्याची धमकी दिली आहे. 12 डेपोट पैकी एकही बस मागील दिवसात धावली नाहीये.

5 suspended ST employees in Kolhapur Depot threaten jal samadhi


राज्य शासनाकडून आता धमक्या, हजर व्हा, अन्यथा कामावरून काढणार, एसटीतील २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटीस


एमएसआरटीसी वर्कर्स असोसिएशनचे हेड उत्तम पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना सांगितले की, मागील 11 दिवसांपासून आमचा संप चालू आहे. पण सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. पँनडेमिक मध्ये एकूण 40 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सस्पेंड केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पाच जण जलसमाधी घेण्यासाठी तयार आहेत. आमच्याकडून सरकारला हे फायनल अल्टिमेटम आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यादरम्यान सामान्य प्रवाशांचे मात्र प्रवासाबाबत गैरसोय होताना दिसून येतेय.

5 suspended ST employees in Kolhapur Depot threaten jal samadhi

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात