त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला


विशेष प्रतिनिधी

आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या हल्यात १९ जण जखमी झाले. या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयावरच हल्ला केला.In Tripura too, Trinamool Congress bullying, attack on BJP office

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्यभूमीवर झालेल्या या हाणामारीत जखमी झालेल्यांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तेलियामुरा एसडीएम मोहम्मद सज्जाद पी यांनी प्रभाग 13, 14 आणि 15 मध्ये कलम 144 लागू केले. हा आदेश २४ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सुब्रत चक्रवर्ती यांनी सांगितले की बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास टीएमसीचे कार्यकर्ते कालितिला भागात निदर्शने करत असताना वाद सुरू झाला. ते भाजप कार्यालयाजवळ पोहोचले. दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आल्याचे त्यांनी सांगितले.

अचानक टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजप समर्थकांवर हल्ला केला. त्यानंतर दुसºया बाजूनेही हल्ला केला. चक्रवर्ती म्हणाले, पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.

या प्रकरणी तेलियामपुरा पोलिस ठाण्यात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी दोन गुन्हे टीएमसी कार्यकर्ता अनिर्बन सरकारच्या वडिलांनी नोंदवले आहेत. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकारसह पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

In Tripura too, Trinamool Congress bullying, attack on BJP office

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण