कोरोनाचे गांभिर्य लोकांना समजेना, तिसऱ्या लाटेविषयी बोलतोय आणि लोकांना वाटतेय हवामानाचे अपडेट देतोय, केंद्रीय आरोग्य विभागाची खठत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजत नाही. जेव्हा आम्ही तिसऱ्या लाटेविषयी बोलतो तेव्हा त्यांना असे वाटते की आम्ही हवामान अपडेट देत आहोत. कदाचित म्हणूनच कोरोना प्रोटोकॉलशिवाय बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसत आहे, अशी चिंता आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.talking about the third wave and people are giving weather updates, the Central Health Department said.

नीती आयोग्याचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये तिसरी लाट दिसत आहे. अशा वेळी आपल्याला ठरवावे लागेल की, तिसऱ्या लाटेचा परिणाम भारतात होऊ नये. त्यांनी म्हटले की, यावेळी दररोज जगभरात 3.90 लाख नवीन केस समोर येत आहेत.



दुसऱ्या लाटेदरम्यान 9 लाख केस समोर येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्पष्ट म्हटले आहे की, तिसरी लाट कधी येईल, यावर चर्चा करण्याऐवजी आपण याच्या दक्षतांवर लक्ष द्यायला हवे.देशात यावेळी 4.31 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि रिकव्हरी रेट 97.3% आहे. या दरम्यान देशातील 73 असे जिल्हे आहेत, जेथे दररोज 100 पेक्षा जास्त नवीन केस मिळत आहेत. 2 जूनला अशा जिल्ह्यांची संख्या 262 होती आणि त्यापूर्वी 4 मे रोजी 531 जिल्हे असे होते.

देशात कोरोनाचे कमी होत असलेल्या प्रकरणांमध्ये केरळ-महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये सर्वात जास्त प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान 50% पेक्षा जास्त नवीन केस केवळ केरळ आणि महाराष्ट्रात मिळत आहेत. या दोघांव्यतिरिक्त तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही सर्वात जास्त प्रकरणे समोर येत आहेत.

यासोबतच मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अरुणाचलमध्येही नवीन प्रकरणे वाढत आहेत. राज्यांना मदत करण्यासाठी केंद्राकडून 11 राज्यांत टीम पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ आणि ओडिशाचा समावेश आहे.

talking about the third wave and people are giving weather updates, the Central Health Department said.

महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात