एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अन्यायकारक, डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाई रद्द करण्याची मागणी


एसटी कर्मचाऱ्यांचा शांतेत संप सुरू आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन अन्यायकारक आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.Suspension of ST employees is unjust, Dr. Bharti Pawar’s demand to the Chief Minister to cancel the action


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्याचा शांतेत संप सुरू आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन अन्यायकारक आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राज्यभरात संप सुरु आहे. आपल्या न्याय हक्कासाठी एसटी कर्मचारी शांततेत संपात सहभागी आहेत.



परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने काही एसटी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे. हे निलंबन एसटी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करत त्यांच्याशी संवाद साधून यावर तोडगा काढणे गरजेचे असून, तसेच त्यांच्यावर केलेली कारवाई रद्द करावी ही विनंती.

राज्य सरकारने विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून, गेल्या दोन दिवसांत आणखी १२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार १७८ झाली असून ११ नोव्हेंबपर्यंत एकूण २ हजार ५३ कर्मचारी निलंबित झाले आहेत.

Suspension of ST employees is unjust, Dr. Bharti Pawar’s demand to the Chief Minister to cancel the action

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात