गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर मणिपूरमध्ये 144 शस्त्रांचे समर्पण, हायटेक रायफल आणि ग्रेनेडचा समावेश; 5 जिल्ह्यांतून कर्फ्यू हटला


वृत्तसंस्था

इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर मणिपूरमधील हिंसा घडवणाऱ्यांनी 144 शस्त्रे आणि 11 मॅगझिनचे समर्पण केले आहे. यामध्ये SLR 29, Carbine, AK, INSAS रायफल, INSAS LMG, M16 रायफल आणि ग्रेनेड यांसारख्या हायटेक रायफल्सचा समावेश आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी ही माहिती दिली.Surrender of 144 weapons, including hi-tech rifles and grenades in Manipur after Home Minister’s appeal; Curfew lifted from 5 districts

त्यांनी सांगितले की, इंफाळ पूर्वमध्ये 102 शस्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे. तेंगनौपल जिल्ह्यात 35 शस्त्रे समर्पण करण्यात आली असून त्यापैकी 18 शस्त्रांचे समर्पण एकट्या मोरेमध्येच झाले आहे. इंफाळ पश्चिम येथून 2 शस्त्रे, थौबल येथून 5 शस्त्रे समर्पण करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे. राज्यात 3 मे रोजी हिंसाचार उसळला होता. यानंतर सुरक्षा दलांची सुमारे 2 हजार शस्त्रे लुटण्यात आली.



महिना उलटूनही राज्यातील हिंसाचार थांबत नसताना, गृहमंत्री अमित शहा 29 मे रोजी 4 दिवसांच्या दौऱ्यावर मणिपूरला पोहोचले. गुरुवारी शहा यांनी मणिपूरमधील लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका, असे सांगितले. शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

2 जूनपासून शोधमोहीम सुरू होणार असल्याचे शहा यांनी सांगितले होते. कोणाकडे शस्त्रसाठा आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल. या घोषणेच्या अवघ्या 24 तासांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने उपद्रवींनी आत्मसमर्पण केले आहे. दुसरीकडे, राज्यातील 5 जिल्ह्यांमधून संचारबंदी उठवण्यात आली आहे.

अमित शहा मणिपूरमध्ये 4 दिवस राहिले

3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच राज्याचा दौरा केला. 29 मे ते 1 जून म्हणजेच 4 दिवस ते येथे राहिले. त्यांच्यासोबत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका हेही उपस्थित होते. शहा यांनी 4 दिवसांच्या दौऱ्यात अनेक निर्णय घेतले. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्याच्या डीजीपींना हटवण्याचा होता.

Surrender of 144 weapons, including hi-tech rifles and grenades in Manipur after Home Minister’s appeal; Curfew lifted from 5 districts

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात