स्टॅँड अप इंडियातून सव्या लाख नवउदयेजकांना बळ, पाच वर्षांत २५ हजार ५८६ कोटी रुपयांची कर्जे


नवउद्योजकांना उभे राहण्यासाठी बळ देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टॅँड अप इंडिय योजनेतून सव्वा लाख तरुणांना उद्योजकतेची संधी मिळाली आहे. सरकारने गेल्या पाच वर्षांत २५ हजार ५८६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. Stand-up India empowers 1.5 lakh new entrepreneurs, loans worth Rs 25,586 crore in five years


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवउद्योजकांना उभे राहण्यासाठी बळ देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टॅँड अप इंडिय योजनेतून सव्वा लाख तरुणांना उद्योजकतेची संधी मिळाली आहे. सरकारने गेल्या पाच वर्षांत २५ हजार ५८६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये देशातील अनुसूचित जाती, जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करून स्टँड अप इंडिया योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातुन महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरुण उद्योजक होऊ शकतील. भारतीय तरुणांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना सरकारकडून प्रोत्साहन आणि मदत मिळाली तर ते उद्योकतेचा नवा अध्याय सुरू शकतील या विश्वासातून पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली.

भारतीय तरुणांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरविला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत १,१४, ३२२ तरुणांनी स्टॅँड अप इंडिया योजनेचा फायदा घेतला आहे. त्यांना २५,५८६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.



या योजनेंतर्गत अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना नवीन प्रकल्प किंवा ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी दहा लाख रुपयांपासून एक कोटी रुपयापर्यंतची कर्जे दिली जातात.अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट (नवीन प्रोजेक्ट) उभारण्यासाठी स्टँडअप इंडिया लोन घेता येतो. प्रकल्प व्यवसाय निर्मिती क्षेत्र
या योजनेतून नवउद्योजकांना १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

मुदती कर्ज आणि खेळते भांडवल कर्ज यापैकी एक किंवा दोन्ही घेऊ शकता. दोन्ही प्रकारची कर्जे घेतली तर एकूण कर्ज 1 कोटींपेक्षा जास्त असू शकत नाही. यासाठी २५ टक्के रक्कम स्वत:ची असणे आवश्यक आहे. मात्र, इतर योजनांमधूनही ही रक्कम उभी करता येऊ शकते. योजनेच्या नियमांनुसार, किमान १०% कर्जदाराला स्वत: चे पैसे गुंतवावे लागतात.

Stand-up India empowers 1.5 lakh new entrepreneurs, loans worth Rs 25,586 crore in five years


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात