कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार नाही कपात, सरकारची नवी वेतन संहिता लांबणीवर


कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार आराखड्यात  बदल होणार नाही. यामुळे आता हातात मिळणारा पगार कमी होणार नाही.  There will be no reduction in the salaries of the employees, on the extension of the new pay code of the government


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार आराखड्यात  बदल होणार नाही. यामुळे आता हातात मिळणारा पगार कमी होणार नाही.

यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  नव्या कामगार कायद्यांबाबत राज्यांनी नियमांना अंतिम रूप दिलेले नाही. यामुळे केंद्राने वेतन संहितेचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे कंपन्यांना आराखड्यात बदलासाठी आणखी वेळ मिळेल.
नवी वेतन संहिता लागू झाल्यानंतर पगारदारांच्या पगाराच्या आराखड्यात  मोठा बदल झाला असता. यामुळे हाती पडणारा पगार कमी झाला असता. तसेच पगारातील मोठा हिस्सा पीएफ खात्यात जमा झाला असता. या नियमानुसार, वेतनात बेसिक सॅलरीचा पार्ट ५० टक्के असणे आवश्यक आहे. पीएफपोटी जास्त रक्कम द्यावी लागू नये म्हणून कंपन्या तो पार्ट कमीच ठेवत असतात.

There will be no reduction in the salaries of the employees, on the extension of the new pay code of the government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात