तेलंगणामधील सरकारी कर्मचाऱ्याची दिवाळी, मुख्यमंत्री केसीआरनी पगारात केली ३० टक्के वाढ, निवृत्तीचे वय ५८ वरून ६२

तेलंगणामधील सरकारी कर्मचाऱ्याची अक्षरश: दिवाळी झाली आहे. कर्मचाऱ्याच्या पगारात ३० टक्के घसघसीत वाढ करण्याबरोबरच निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करण्याची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर)यांनी विधानसभेत केली आहे.


विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : तेलंगणामधील सरकारी कर्मचाऱ्याची अक्षरश: दिवाळी झाली आहे. कर्मचाऱ्याच्या पगारात ३० टक्के घसघसीत वाढ करण्याबरोबरच निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करण्याची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर)यांनी विधानसभेत केली आहे. Diwali for Telangana government employees, CM KCR raises salaries by 30 per cent, retirement age rises from 58 to 62

तेलंगणामधील नऊ लाख सरकारी कर्मचाऱ्याना याचा फायदा होणार आहे. १ एप्रिलपासून या घोेषणेची अंमलबजावणी होणार आहे. तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचाºयांच्या ११ व्या वेतन आयोगाची स्थापना निवृत्त आयएएस अधिकारी सी. आर. बिस्वल यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. या आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीचा वेतन आयोग २०१४ मध्ये नेमण्यात आला होता. तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर नेमलेल्या या वेतन आयोगात सरकारने कर्मचाऱ्याना ४३ टक्के वेतनवाढ दिली होती.केसीआर हे लोकप्रिय घोषणा करणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. वेतनवाढीची घोषणा करताना केसीआर यांनी कर्मचाऱ्याची वेतनआयोगाला विलंब झाल्याबद्दल माफी मागितली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे हा विलंब झाला. कारण अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली होती. मात्र, आता सरकारने वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

केसीआर म्हणाले, आम्ही बेसीक सॅलरीमध्ये ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन आयोगाने आपल्या शिफारसीमध्ये केवळ ७ टक्के वेतनवाढ करण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही ३० टक्के वेतनवाढीचा निर्णय घेतला. पूर्ण वेळ कर्मचाºयांसोबतच कंत्राटी कर्मचारी, रोजंदारीवरील मुरांनाही याचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा ९ लाख १७ हजार ७९७ कर्मचाऱ्याना होणार आहे.

Diwali for Telangana government employees, CM KCR raises salaries by 30 per cent, retirement age rises from 58 to 62

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*