चाणाक्ष ममतादीदींची नवी खेळी; म्हणून उतरविले समाजवादी खासदार जया बच्चनना प्रचारात…


विशेष प्रतिनिधी

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी जसजशी शिगेला पोहोचत आहे तसतसे त्यात रंग भरले जात आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी आता तृणमुलने थेट ज्येष्ठ अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना प्रचारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. चाणाक्ष ममतादीदींचा हा मास्टरस्ट्रोक मानला जातो. SP MP Jaya Bacchan campaign for TMC

भाजपने सिनेअभिनेते मिथुनदा यांना प्रचारात उतरवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी तृणमुलने मुळच्या बंगाली असलेल्या जया बच्चन यांना प्रचारात उतरवून सर्वानाच धक्का दिला आहे. जया यांना बंगाली जनता आपली लेक मानते तर अमिताभना जावई मानते. ममतादिदींनी त्यामुळेच चाणाक्षपणे त्यांमा आणले आहे.



जया भादुरी-बच्चन या मूळच्या बंगाली असून बंगाली विनोदी प्रेमपट ‘धनई मेये’मधून ‘१९७१ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘बांगला बांगलर मेये मे के चाई’ (बंगालमधील जनतेला बंगाली मुख्यमंत्री हवा आहे.) ही ‘तृणमूल’ची घोषणा जया बच्चन यांच्या प्रचारातून सातत्याने पुढे आणण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयोजनाखाली पश्चिनम बंगालमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवांना जया बच्चन यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी हजेरी असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जया बच्चन यांनी ‘तृणमूल’ने प्रचारात सहभागी करून घेतले आहे.

दरम्यान, कोलकत्याला पोहोचल्यानंतर जया बच्चन म्हणाल्या, ‘‘तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी मला येथे येण्यास माझ्या पक्षाने सांगितले आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रती माझ्या मनात अत्यंत आदर आणि सन्मान आहे. सर्व प्रकारच्या अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्या त्या एकमेव महिला नेत्या आहेत.बंगालींना धमकावून येथे कोणीही यशस्वी झालेले नाही. बंगालच्या सन्मानासाठी त्या लढत आहेत.’’

SP MP Jaya Bacchan campaign for TMC


महत्त्वाची बातमी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात