तालिबानच्या समर्थनासाठी लिहिली सोशल मीडिया पोस्ट, आसाम पोलिसांनी 14 जणांना केली अटक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याबद्दल 14 जणांना आसामच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून अटक सुरू होती. सर्व आरोपींवर बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Social media post written in support of Taliban Assam Police arrested 14 people



 

विशेष डीजीपी जीपी सिंह म्हणाले की, आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टसाठी 14 लोकांना अटक केली आहे. सिंग म्हणाले की, या सर्वांनी देशाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट इत्यादींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

आसाम पोलिसांची प्रक्षोभक पोस्टवर नजर

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस सतर्क आहेत आणि प्रक्षोभक पोस्टसाठी सोशल मीडियावर बारीक नजर ठेवून आहेत. कामरूप महानगर, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ते म्हणाले की, दरंग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक बरुआ म्हणाले की, आसाम पोलीस सोशल मीडियावरील तालिबान समर्थक टिप्पणीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहे कारण ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे.

 Social media post written in support of Taliban Assam Police arrested 14 people

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात