काबूलमध्ये 150 हून अधिक भारतीयांना ताब्यात घेतल्याचा दावा, तालिबानने म्हटले – सर्व सुरक्षित, विमानतळावर पोहोचवले


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानातील अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, काबूल सोडण्याची वाट पाहणाऱ्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या मते, अपहरण झालेल्या लोकांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.Afghanistan people including indians kidnapped by taliban near kabul airport

अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. भारत सरकारने देखील यासंदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. वृत्तानुसार, काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे.



तालिबानकडून खंडन

तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसीक यांनी अपहरणाच्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी अफगाण माध्यमांच्या एका सदस्याशी याबद्दल याविषयावर संवाद साधला. एएनआयने अफगाण माध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, सर्व भारतीय सुरक्षित आहेत आणि बाहेर पडण्यासाठी त्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत.

भारतीय हवाई दलाच्या सी -130 जे विमानाने 85 भारतीयांसोबत उड्डाण केले तेव्हा हा अहवाल समोर आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विमानाने इंधन भरण्यासाठी ताजिकिस्तानमध्ये लँडिंग केले. काबुलमधील अधिकारी भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. हवाई दलाचे विमान भारतीयांना दुशान्बे, ताजिकिस्तानमध्ये सोडेल आणि नंतर ते एअर इंडियाच्या विमानाने देशात परत येतील.

एनडीटीव्हीनुसार, सूत्रांनी आज सांगितले की, सरकार अधिकाधिक भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे काबूल विमानतळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने आतापर्यंत आपल्या दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे, परंतु अंदाजे एक हजार भारतीय नागरिक वेगवेगळ्या शहरात आहेत असा अंदाज आहे. यापैकी 200 शीख आणि हिंदूंनी काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे.

Afghanistan people including indians kidnapped by taliban near kabul airport

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात