उज्जैनमध्ये मोहरमच्या दिवशी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, चौघेजण अटक तर 10 जणांची पटली ओळख


थाना खारा कुआन भागात मोहरमच्या एक दिवस आधी ताजिया दौऱ्यादरम्यान जमावाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.तर 10 जणांची ओळख पटली आहे. Ujjain announces Pakistan Zindabad on Moharram day, arrests four, identifies 10


विशेष प्रतिनिधी

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.असा आरोप आहे की थाना खारा कुआन भागात मोहरमच्या एक दिवस आधी ताजिया दौऱ्यादरम्यान जमावाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, तर 10 जणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोना महामारीमुळे कोणत्याही प्रकारच्या मिरवणूक आणि रॅली इत्यादींना प्रशासनाने बंदी घातली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण मोहरमचा घोडा काढण्याची मागणी करत होते.प्रशासनाने परवानगी न दिल्याने तेथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.त्याचवेळी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथून सर्वांना पांगवले.

परिसरातील व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 10 जणांची ओळख पटली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांच्या मते, 4 लोकांना अटक करण्यात आली आहे.तपास सुरू आहे, इतरांनाही लवकरच अटक केली जाईल.  त्यांनी सांगितले की, तरुणांकडून तालिबानशी संबंधित घोषणा दिल्या जात नाहीत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आम्ही या घटनेसंदर्भात कडक कारवाई केली आहे.  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Ujjain announces Pakistan Zindabad on Moharram day, arrests four, identifies 10

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती