आंध्र प्रदेशात एकाच वेळी 13 जिल्ह्यांची निर्मिती ; राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापासून वेगळा केला एक जिल्हा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय


आंध्रमध्ये आजपासून 13 नवीन जिल्हे अस्तित्वात आले आहेत. जगनमोहन रेड्डी सरकारने राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर आता एकूण जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 13 नवीन जिल्ह्यांचा शुभारंभ केला.Simultaneous creation of 13 districts in Andhra Pradesh One district separated from each district in the state, a big decision of Chief Minister Jaganmohan Reddy


वृत्तसंस्था

अमरावती : आंध्रमध्ये आजपासून 13 नवीन जिल्हे अस्तित्वात आले आहेत. जगनमोहन रेड्डी सरकारने राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर आता एकूण जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 13 नवीन जिल्ह्यांचा शुभारंभ केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांनी वचन दिले होते की त्यांचा पक्ष राज्यात सत्तेवर आल्यास प्रत्येक लोकसभा मतदारसंघ एक जिल्हा करेल. राज्यात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. जिल्ह्यांची संख्या आता 26 झाली आहे.



राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?

1 मन्यामची विजयनगरम जिल्ह्यातून निर्मिती.

2 अनकापल्ली जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यापासून बनविला.

3 विशाखापट्टणम जिल्ह्यातून अल्लुरी सीताराम राजू झाले.

4 पालनाडू हे गुंटूर जिल्ह्यांतून वेगळे केले.

5 बापटला गुंटूर जिल्ह्यातून बनवले.

6 कुर्नूल जिल्ह्यातून नंद्याल हा नवीन जिल्हा बनला.

7 पूर्व गोदावरी जिल्ह्यामधून काकीनाडा जिल्हा तयार करण्यात आला.

8 कोनसीमादेखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून बनला.

9 एलुरू पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून बनला.

10 श्री सत्य साई जिल्हा अनंतपूरमधून बनला.

11 एनटी रामाराव जिल्हा अस्तित्वात असलेल्या कृष्णा जिल्ह्यापासून बनविला गेला.

12 श्रीबालाजी हा चित्तूर जिल्ह्यातून बनला.

13 अन्नामाया हा नवीन जिल्हा कडप्पा जिल्ह्यामधून तयार करण्यात आला.

13 जिल्हे शिल्लक होते

2014 मध्ये तेलंगणा वेगळे राज्य झाल्यानंतर आंध्र प्रदेशात 13 जिल्हे शिल्लक राहिले होते. जानेवारीमध्ये आंध्र प्रदेश सरकारने विद्यमान 13 मधूनच 26 जिल्हे तयार करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना नवीन जिल्ह्यांसाठी कार्यालय वाटप प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले होते. अधिकाऱ्यांना 4 एप्रिल रोजी सर्व नवीन 13 जिल्हा कार्यालयात हजेरी लावून कामकाज सुरू करण्यास सांगण्यात आले.

नवीन जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि एसपींची नियुक्ती

6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सर्व गाव आणि प्रभाग सचिवालयात 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सत्कार करतील. शनिवारी राजपत्रातील अधिसूचनेनंतर, वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फेरबदल केली आणि नवीन जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि एसपी नियुक्त केले.

Simultaneous creation of 13 districts in Andhra Pradesh One district separated from each district in the state, a big decision of Chief Minister Jaganmohan Reddy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात