स्वत: जखमी असताना दहशतवाद्यांशी लढत वाचविले सहकाऱ्यांचे प्राण, राष्ट्रपतींनी अशोक चक्र प्रदान करून केला शहीदाचा सन्मान


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वत: जखमी झाले असतानाही दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविले. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनच प्राण सोडले. जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केले.Self-injured police officer saved while fighting terrorists, President honors martyrs by awarding Ashoka Chakra

एएसआय बाबूराम यांची पत्नी रीना रानी आणि मुलगा मानिक यांनी राष्ट्रपतींनी दिलेला सन्मान स्विकारला. एका चकमकीत बाबूराम यांनी स्वत: जखमी होऊनही तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच धाडसाने लढत आपल्या सहकाºयांना वाचवले होते.



एएसआय बाबूराम आपल्या सेवेत १४ दहशतवाद विरोधी चकमकींत भाग घेतला होता. यात त्यांनी २८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. बाबूराम यांनी एसओजीमध्ये तैनात असताना २९ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या अखेरच्या आॅपरेशनमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार केले. मात्र, यात त्यांना वीरमरण आले. ते या ३ दहशतवाद्यांशी ९ तास लढत होते.

२९ आॅगस्ट २०२० रोजी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी एएसआय बाबूराम आपल्या टीमसोबत पंथा चौकात महामार्गावरून जाणाºया वाहनांवर नजर ठेऊन होते. त्यावेळी एका स्कुटीवर ३ दहशतवादी आले. त्यांनी सीआरपीएफच्या जवानावर हल्ला केला. दहशतवादी सीआरपीएफ जवानाचे शस्त्र हिसकावून घेत होते.

यानंतर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आणि जवळच्या वस्तीत पळाले. यानंतर एएसआय बाबूराम यांनी आपल्या सहकाºयांसह दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि एका घराला घेराव घातला. सुरुवातीला घरात अडकलेल्या माणसांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांना समर्पण करण्यास सांगण्यात आलं.

मात्र, दहशतवाद्यांनी बाबूराम यांच्यावर गोळीबार केला. यानंतरही बाबूराम मागे हटले नाही. त्यांनी लश्करचा कमांडर साकिब बशीरशी लढा केला आणि काही वेळातच दहशतवाद्यांचा कमांडर साकिब मारला गेला.

या चकमकीत दहशतवाद्यांचा कमांडर साकिब बशीरसह इउमर तारिक आणि जुबेर अहमद हे दोन सहकारी देखील मारले गेले. मात्र, या कारवाई दरम्यान बाबूराम देखील जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचे प्राण वाचविताना आले नाहीत. बाबूराम यांचा जन्म पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागातील धारना गावात १५ मे १९७२ रोजी झाला.

Self-injured police officer saved while fighting terrorists, President honors martyrs by awarding Ashoka Chakra

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात