ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट (वय ७८ ) यांचे पुण्यातील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. Social activist senior writer anil awachat passes away in pune

अनिल अवचट यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी मुक्तांगण या केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे डॉक्टर होते. १९६९ मध्ये त्यांनी पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धत जगभरात प्रसिद्ध झाली असून अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जात आहे.

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदारसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. अनिल अवचट हे पत्रकार होते. त्यांनी पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.

Social activist senior writer anil awachat passes away in pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण