झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी उडवला रेल्वे ट्रॅक, रेल्वेगाड्यांची वाहतूक झाली ठप्प


विशेष प्रतिनिधी

रांची : झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोटकरून रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे. त्यामुळे आणेल रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. Naxals blow up in Jharkhand Railway tracks, trains were jammed

हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक बंद केली तर काही गाड्या मार्ग बदलून वेगळ्या मार्गावरुन सुरु आहेत. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलमन गौरव राज आणि रोहित कुमार सिंह यांनी चिचकीच्या स्टेशन मास्टरला मध्यरात्री १२.३० वाजता धनबाद विभागातील करमाबाद-चिचकी स्टेशन दरम्यान स्फोट झाल्याची माहिती दिली. यानंतर हावडा-दिल्ली रेल्वे मार्गाच्या गोमो-गया रेल्वे विभागावरील इनकमिंग आणि आउटगोइंग लाइनवरील ऑपरेशन्स सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्या आहेत.



स्फोटामुळे हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या स्फोटानंतर रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा या लाईनमध्ये स्फोट झाला. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रेल्वेगाडीचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरून अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

Naxals blow up in Jharkhand Railway tracks, trains were jammed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी