रशिया- युक्रेन युध्दामुळे शेअर बाजार पडले, भारतातील गुंतवणूकदारांचे 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप बुधवारी 255.68 लाख कोटी रुपये होते, जे गुरुवारी 242.28 लाख कोटी रुपये झाले. आॅक्टोबरमध्ये जेव्हा सेन्सेक्स विक्रमी 62 हजारांवर होता,Russia-Ukraine war plunges stock market, hurts Indian investors by Rs 13.4 lakh crore

तेव्हा मार्केट कॅप 274 लाख कोटींच्या पुढे गेला होता. त्या पातळीवर पाहता हा तोटा 32 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. गुरुवारी, 24 फेब्रुवारी रोजी देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजमधून गुंतवणूकदारांचे 80 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.



आॅक्टोबरमध्ये जेव्हा सेन्सेक्स विक्रमी 62 हजारांवर होता, तेव्हा मार्केट कॅप 274 लाख कोटींच्या पुढे गेला होता. त्या पातळीवर पाहता हा तोटा 32 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. गुरुवारी, 24 फेब्रुवारी रोजी देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजमधून गुंतवणूकदारांचे 80 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी रिलायन्सचे मार्केट कॅप 16.05 लाख कोटी रुपये होते, जे आज 15.25 लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत टॉप कंपन्यांबद्दल बोलायचे तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ला 53 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. काल त्यांचे मार्केट कॅप 13.11 लाख कोटी रुपये होते, जे आज 12.58 लाख कोटी रुपये झाले आहे. ऌऊऋउ बँकेचे मूल्य 46 हजार कोटी रुपयांनी घटून 7.86 लाख कोटी रुपयांवर आले आहे. बुधवारी ते 8.32 लाख कोटी रुपये होते.

रिलायन्सचे मार्केट कॅप 1.12 लाख कोटी रुपयांनी (6.78%) कमी झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांना 66 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इन्फोसिसचे मार्केट कॅप 7.33 लाख कोटी रुपयांवरून 28 हजार कोटींनी घसरून 7.05 लाख कोटी रुपयांवर आले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हचे मूल्य बुधवारी 5.31 लाख कोटी रुपयांवरून 21 हजार कोटी रुपयांनी घसरून 5.10 लाख कोटी रुपयांवर आले.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियन बाजाराला गुरुवारी 250 अब्ज डॉलर किंवा 18.75 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा बाजार हिस्सा 45% घसरला. या घटनेनंतर, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 105 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत.

Russia-Ukraine war plunges stock market, hurts Indian investors by Rs 13.4 lakh crore

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात