राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय PFI च्या निशाण्यावर; महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा


प्रतिनिधी

मुंबई : भारतात घातपाती कृत्य घडवून आणण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हिच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरातील मुख्यालय रेशीमबाग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर कारवाई केली होती. त्यानंतर सुरू असलेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात ही माहिती पुढे आली आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh headquarters targeted by PFI

 तपासात धक्कादायक माहिती

याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने सुरू केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसेच भाजपचे नेतेही पीएफआयच्या रडारवर असल्याचे उघड झाले आहे. तसेच पीएफआयच्या म्होरक्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाची तपशीलवार माहिती गोळा केली होती. दसऱ्याच्या दिवशी संघ मुख्यालयात कार्यालयात कार्यक्रम होत असतो त्याचीही तपशीलवार माहिती मिळवली होती. त्याचबरोबर भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांची माहितीही एकत्र करण्यात आली होती.



याबाबतचा आणखी तपास एटीएस पुढे तपास त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्यांना आज, सोमवारी न्यायालयासमोर हजर केल्यावर त्यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विश्व हिंदू परिषद, संबधित मोठ्या व्यक्ती याबद्दलची आणखी काही माहिती, त्यांची नावे इतर काही माहिती मिळते का?, याबाबतची चौकशी सुरू आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh headquarters targeted by PFI

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय