राजस्थान काँग्रेस मधील पेचप्रसंगात गहलोत गट – काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या परस्पर विसंगत वक्तव्यांनी भर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गट आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक यांची राजस्थान मधल्या राजकीय पेचप्रसंगावर परस्पर विसंगत वक्तव्य समोर आली आहेत. अशोक गहलोत यांचा गट कालपासूनच सचिन पायलट यांच्या विरोधात पर्यायाने काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आक्रमक आहे. त्याच वेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सर्व आमदारांची वन-टू-वन चर्चा करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षनिरीक्षकांची चर्चा होऊ शकत नाही, अशी भूमिका गहलोत गटाने घेतली आहे. Gehlot group in Rajasthan Congress in trouble

या पार्श्वभूमीवर आज गहलोत गटाचे मंत्री आणि आमदार प्रताप सिंह खाचरियास यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. राजस्थानात लवकरच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट घुसणार आहे. काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल. प्रसंगी आम्ही त्यासाठी रस्त्यावर रक्त देखील सांडू. पण काँग्रेस हाय कमांडणे आमचे म्हणणे तरी निदान ऐकून घेतले पाहिजे, असे वक्तव्य खाचरियास यांनी केले आहे. यातून त्यांनी काँग्रेस हायकमांडला अशोक गहलोत सांगतील तेच नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत हा सूचक पण स्पष्ट इशारा दिला आहे.



मात्र याच पेचप्रसंगावर काँग्रेसचे पक्ष निरीक्षक खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांचे वेगळे वक्तव्य आले आहे. राजस्थानात दोन दिवसात नेमके काय घडले हे आम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्ट सांगितले आहे. काँग्रेस हायकमांड योग्य तो निर्णय घेईल. तो सर्वांना मान्य करावा लागेल. पक्षामध्ये शिस्त आवश्यक आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.

 

 

याचा अर्थ काँग्रेस हायकमांडने विशिष्ट निर्णय घेतला की तो राजस्थानमध्ये अशोक गहलोत गट आणि सचिन पायलट गट या दोघांनाही मान्य करावा लागेल असा आहे. पण अशोक गहलोत गट सध्या याबाबतीत कोणाचे ऐकण्याच्या राजकीय मूडमध्ये दिसत नाही. गहलोत गटाचे 80 पेक्षा अधिक आमदार राजीनामा देण्याचा इशारा देऊन बसले आहेत. अशावेळी गहलोत गट आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक यांच्यातील परस्पर विसंगत वक्तव्यांमुळे पेचप्रसंगात अधिक भर पडल्याचे दिसत आहे.

Gehlot group in Rajasthan Congress in trouble

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात