राजस्थानातील पेचप्रसंगाच्या निमित्ताने प्रश्न; अशोक गहलोत काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील??


विशेष प्रतिनिधी

राजस्थान : राजस्थानात 25 सप्टेंबरच्या रात्री ते 26 सप्टेंबर सकाळपर्यंत काँग्रेसमध्ये जी राजकीय उठा पटक झाली, तिचा मुख्यमंत्री पदासंदर्भात निकाल काय लागायचा तो लागो… पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून अशोक गहलोत पाय उतार झाल्यानंतर ते जर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले, तरी ते सर्वांना बरोबर घेऊन चालणारे काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील का??, हा खरा प्रश्न आहे!!Rajasthan Congress Crisis : will ashok gehlot be proved as all inclusive Congress president??

याचे कारण राजस्थान मधल्या काँग्रेस मधील घडामोडींमध्येच दडले आहे. मूळात अशोक गहलोत यांनी स्वतःकडे जे मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवले होते, त्यात त्यांच्या राजकीय कौशल्या बरोबरच ते सर्व सहमतीचे उमेदवार नाहीत तर त्यांचा आमदारांचा राजकीय गट मजबूत असल्याने ते मुख्यमंत्रीपदावर आहेत ही बाब स्पष्ट होती. याचा अर्थ अशोक गहलोत हे स्वतःच्या गृह राज्यात देखील काँग्रेसचे एकमुखी नेतृत्व नव्हते, तर काँग्रेसमध्ये सचिन पायलट आपल्या पाठीशी संख्येने पुरेशा आमदारांचे पाठबळ उभे करू शकले नाहीत म्हणून अशोक गहलोत हे बहुसंख्य आमदारांचे नेते म्हणून मुख्यमंत्री राहिले होते, असा याचा अर्थ होतो!! त्याचबरोबर सचिन पायलट यांच्या गटाला अल्पमतात ठेवण्यात अशोक गहलोत हे यशस्वी झाले ही देखील वस्तुस्थिती राजस्थानच्या राजकारणात अधोरेखित झाली.



पण म्हणूनच आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतर आपल्याच पसंतीचा उमेदवार मुख्यमंत्री झाला पाहिजे. तो हायकमांडच्या म्हणजे गांधी परिवाराच्याच पसंतीचा असेलही पण पण तो जास्त आपल्या पसंतीचा हवा आणि मुख्य म्हणजे तो मुख्यमंत्री सचिन पायलट नको, अशी अशोक गहलोत यांनी खेळी खेळली आहे. अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यापूर्वी हायकमांड वर म्हणजे गांधी परिवारावर असा दबाव आणल्याचे बोलले जात आहे. सर्व माध्यमांनी तशा बातम्या दिल्या आहेत.

कदाचित राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर अशोक गहलोत हे आपल्या चॉईसचा मुख्यमंत्री बसवूही शकतील किंवा अगदी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदापासून वंचितही ठेवू शकतील… पण मग अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या दिशेने चाललेली जी वाटचाल आहे ती निर्धोक आणि सर्व सहमतीची राहील का??, हा खरा प्रश्न आहे!!

भले अशोक गहलोत सध्या काँग्रेस हायकमांडचे म्हणजे गांधी परिवाराचे काँग्रेस अध्यक्षपदाचे “फर्स्ट चॉईस” उमेदवार असतील, पण राजस्थानातील राजकीय दाने गांधी परिवाराला प्रतिकूल पडली आणि त्याला अशोक गहलोत हेच कारणीभूत ठरले तर ते गांधी परिवाराचा काँग्रेस अध्यक्षपदासाठीचा “फर्स्ट चॉईस” राहतील का??, हा कळीचा प्रश्न आहे.

आणखी एक मुद्दा त्या पलिकडचा देखील आहे. राजस्थान सारख्या आपल्याच गृहराज्यात एकमुखी पाठिंबा न मिळवता आल्याने किंबहुना फक्त “सचिन पायलट नको”, ही भूमिका कायम ठेवल्याने अशोक गहलोत यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या रूपाने राष्ट्रीय राजकारणातल्या एंट्रीलाच मोठा राजकीय फाऊल होणार नाही का?? राजस्थानात ते जर आपल्या नंतरच्या मुख्यमंत्री पदाची निवड व्यापक भूमिका घेऊन सर्वसमावेशकतेने करू शकले नाहीत, तर याचा अर्थ ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत, अशी जर त्यांची प्रतिमा तयार झाली तर ती त्यांना भविष्यातल्या राजकीय कारकीर्दीसाठी ते परवडू शकेल का??, हा तो मुद्दा आहे!!

अशोक गहलोत यांनी काँग्रेस पक्षाने आपल्याला 40 वर्षे विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. आपण कोणत्याही पदावर न राहता देखील काम करू शकतो, असे जे म्हटले आहे, त्यातले स्पिरिट त्यांच्या कालच्या राजकीय कृतीत दिसले आहे का?? या प्रश्नाचे उत्तर अशोक गहलोत भविष्यातल्या त्यांच्या राजकीय कृतीतून देणार आहेत का?? हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

अशोक गहलोत यांना एकाच वेळी राजस्थान मधल्या सत्तेवरची आपली पकड तर दिली होऊ द्यायची नाही. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाला गवसणी घालायची आहे. आणि “सचिन पायलट नको” हा मुद्दाही रेटायचा आहे. ही तिहेरी रणनीती कितीही आकर्षक वाटली आणि त्यामध्ये अशोक गहलोत सध्या जरी कितीही यशस्वी झाले, तरी शीर्षकात विचारलेला प्रश्न यानिमित्ताने अधिक ठळक होतो, तो म्हणजे अशोक गहलोत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तरी ते सर्वांना एकजुटीने पुढे घेऊन जाणारे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील का??… अशोक गहलोत यांच्या राजकीय कृतीतच त्याचे उत्तर दडलेले आहे. फक्त “सचिन पायलट नको” हे उत्तर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी ठरणार नाही!!… त्यासाठी व्यापक भूमिका घ्यावी लागेल. मग अशोक गहलोत तशी व्यापक भूमिका घेतील का??, हा खरा प्रश्न आहे!!

Rajasthan Congress Crisis : will ashok gehlot be proved as all inclusive Congress president??

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात