ताऊंच्या जन्मदिवशी हरियाणात विरोधी ऐक्याची पहिली रॅली, पण काँग्रेस – ममता – केसीआर – केजरीवालांना वगळून!!


वृत्तसंस्था

फतेहबाद : 2019 नंतरच्या विरोधी ऐक्याच्या पहिल्या रॅलीला आज राजकीय मुहूर्त मिळाला या मुहूर्ताचा सर्वपित्री अमावस्येशी संबंध नसून चौधरी देवीलाल उर्फ ताऊ यांच्या जन्मदिवसाशी संबंध होता. जननायक ताऊ चौधरी देवीलाल यांच्या 109 जयंतीचे निमित्त साधून 7 विरोधी पक्षांनी हरियाणातील फतेहबाद येथे विरोधी ऐक्याची पहिली रॅली घेतली. आत्तापर्यंत विरोधी ऐक्याच्या नेत्यांच्या नुसत्या बैठका होत होत्या. पण आता पहिल्यांदा फतेहबादमध्ये 7 का होईना, पण विरोधी पक्षांची एकत्रित रॅली झाली आहे. First rally of opposition unity in Haryana on Tau’s birthday

मात्र, या रॅलीत कोण -‘कोण उपस्थित होते, यापेक्षा कोण हजर नव्हते?, याचीच चर्चा जास्त रंगली. कारण विरोधी ऐक्याच्या पहिल्या रॅलीतून काँग्रेस, ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव आणि अरविंद केजरीवाल यांना वगळले होते. विरोधी ऐक्याच्या या पहिल्या रॅलीत बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल आदी 7 पक्षांचे नेते हजर होते. मुख्य म्हणजे या विरोधी ऐक्याच्या रॅलीतून चौधरी देवीलाल यांचे सुपुत्र आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी स्वतःचे राजकीय रिलॉन्चिंग करून घेतले.

काहीच दिवसांपूर्वी ओमप्रकाश चौटाला हे परीक्षा घोटाळ्याची शिक्षा भोगून तुरुंगा बाहेर आले आहेत. हरियाणा त्यांची सत्ता जाऊन आता 10 – 12 वर्षे उलटून गेली आहेत. ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाल्यानंतर 5 वर्षे भूपिंदर सिंग हुडा यांची सत्ता होती. त्यानंतरची 5 वर्षे भाजपचे नेते मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री होते आणि आता परत मनोहरलाल खट्टर हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ओम प्रकाश चौटाला हे जवळजवळ 10 – 12 वर्षे सत्तेबाहेर आहेत. आता वयाच्या 87 व्या वर्षी राजकीय दृष्ट्या परत ऍक्टिव्ह होऊन त्यांनी हरियाणा स्वतःचे रिलॉन्चिंग केले आहे. यासाठी त्यांनी आपल्या पित्याचा जन्मदिवस निवडला आहे.

या रॅलीमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांची भाषणे होऊन त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर तिखट प्रहार केले आहेत. भाजप नेहमी आपल्या मित्रपक्षांचेच उमेदवार पाडायचा प्रयत्न करतो हा अनुभव 2019 च्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांना आला होता. बिहार सारखे पिछाडीवर गेलेले राज्य आघाडीवर आणण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी आम्ही केली होती. परंतु, भाजप प्रणित केंद्र सरकारने ती कधीच मान्य केली नाही, असा आरोप नितीश कुमार यांनी केला. या आरोपाला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील दुजोरा दिला.

या रॅली नंतर नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे दोन नेते काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. म्हणजे निदान तशा बातम्या तरी आहेत. पण आता काँग्रेसला वगळून झालेल्या या रॅली नंतर सोनिया गांधी यांच्याशी या दोन नेत्यांची भेट कशी होते?, त्यामध्ये काय चर्चा होते?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First rally of opposition unity in Haryana on Tau’s birthday

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात