राजस्थानात काँग्रेस नेतृत्वाची लढाई रस्त्यावर; रस्त्यावरच्या पोस्टर्सवर


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानात नेतृत्वाची लढाई रस्त्यावर आली आहे. इतकेच नाहीतर रस्त्यावरच्या पोस्टर्सवर देखील आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष बनण्यासाठी दिल्लीला जात असतानाच राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत मोठ्या संघर्षापर्यंत पोहोचली आहे. गहलोत समर्थक आमदार विरुद्ध सचिन पायलट ही लढाई केवळ विधिमंडळ पक्षापुरती मर्यादित उरलेली नसून ती रस्त्यावर देखील आली आहे. Congress leadership battle on the streets in Rajasthan; On street posters

गहलोत समर्थक आमदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये छोटे-मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे, तर सचिन पायलट यांचे समर्थक देखील त्यामध्ये मागे नसून जोधपुर मध्ये अनेक रस्त्यांवर सचिन पायलट हे भावी मुख्यमंत्री असल्याची पोस्टर्स समर्थकांनी लावली आहेत. राजस्थानमध्ये नव्या युगाची तयारी अशा स्वरूपाची ही पोस्टर्स आहेत.

 

 

अशोक गहलोत समर्थकांनी राजस्थान मधला नेतृत्वाचा पेचप्रसंग हा 19 ऑक्टोबर नंतर म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतरच सोडवावा, अशी आग्रही मागणी करून अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरच राजस्थानात त्यांच्या ऐवजी दुसरा मुख्यमंत्री मान्य करू असे स्पष्ट केले आहे. शिवाय सचिन पायलट नको ही अशोक गहलोत यांची भूमिका त्यांनी रेटून पुढे लावून धरली आहे.

या सर्व पेचप्रसंगामागे स्वतः अशोक गहलोत असल्याची काँग्रेस हायकमांडची म्हणजेच गांधी परिवाराची धारणा आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हायकमांड सावधानतेने त्या पेचप्रसंगाकडे पाहत आहे. काँग्रेस हायकमांडचा सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा मनसूबा आहे. अर्थात या सर्व सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या बातम्या आहेत. प्रत्यक्षात काँग्रेस हायकमांड अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे अधिकृतरित्या कोणती भूमिका घेणार त्यावर राजस्थान मधल्या पेज प्रसंगावर कोणता तोडगा निघेल हे अवलंबून असणार आहे. पण सध्या तरी राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षातली लढाई जोधपूरच्या रस्त्यावर आणि रस्त्यावरच्या पोस्टर्सवर दिसली आहे.

Congress leadership battle on the streets in Rajasthan; On street posters

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय