अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन खून; आरोपीचा एन्काऊंटर करणार; तेलंगणच्या मंत्र्याचे वक्तव्य


वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा त्याला पकडून एन्काऊंटर करू, असे तेलंगणचे मंत्री चमकूला मल्ला एचडी रेड्डी यांनी म्हटले आहे. Rape and murder of a minor girl; Will encounter the accused; Statement of the Minister of Telangana

आम्ही सरकार म्हणून बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे आहोत. त्यांना आम्ही मदत करू. पण लवकरात लवकर या कुणासोबत गुन्ह्यातील आरोपीला पकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल, असे चमकुला रेड्डी यांनी सांगितले.हैदराबाद पोलिसांनी तीस वर्षे आरोपी राजू याला पकडण्यासाठी दहा लाख रुपयांचे इनाम लावले असून विविध ठिकाणी पोलिसांच्या टीम त्याला अटक करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

तेलंगणमध्ये या बलात्कार प्रकरणामुळे प्रचंड संतापाची भावना असल्याने हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाईसाठी पथके तयार केली आहेत तसेच या संतापातून चमकुला रेड्डी यांचे आरोपीच्या एन्काउण्टरचे विधान आले आहे.

Rape and murder of a minor girl; Will encounter the accused; Statement of the Minister of Telangana

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण