राजस्थानात आता पर्यटकांशी गैरवर्तन पडणार चांगलेच महागात, अजामीनपात्र गुन्हा ठरणार


विशेष प्रतिनिधी

जयपूर – राजस्थानात दरवर्षी लाखो पर्यटक राज्यात येत असतात. पर्यटन हा राज्यातील मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. असे असूनही पर्यटकांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते.Hurting to tourist is Non bailabale crime

त्यात दलालांकडून होणारी फसवणूक आणि बेकायदा विक्रेत्यांचा त्रास सर्वाधिक आहे. त्यामुळे पर्यटकांशी केलेले गैरवर्तन हा आता राजस्थानात दखलपात्र गुन्हा होणार आहे. पुन्हा तोच गुन्हा केल्यास तो अजामीनपात्र असणार आहे.



सुधारित ‘राजस्थान टुरिझम ट्रेड (फॅसिलिटेशन अँड रेग्युलेशन) ॲक्ट’ सोमवारी राज्य विधिमंडळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. सुधारित कायद्यानुसार पर्यटकांशी गैरवर्तणूक, त्यांची फसवणूक हे दखलपात्र गुन्हे होणार आहेत. त्यासाठी विविध कलमांखाली तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा ३० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

गैरवर्तणुकीचा प्रकार पुन्हा पुन्हा घडल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. तसेच अशा वेळी पोलिस संबंधितांना वॉरंटशिवाय अटक करू शकतील. तसेच हा गुन्हा करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षा विविध कलमांनुसार होऊ शकतात.

Hurting to tourist is Non bailabale crime

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात