दिल्ली – मुंबई प्रवास अवघ्या बारा तासांत, राजधानी एक्सप्रेस सुपरफास्ट होणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी दिल्ली ते मुंबई रेल्वेमार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.Rajdhani Express will become superfast

दिल्ली-मुंबई हा प्रवास चार तासांनी कमी करून १२ तासांमध्ये पूर्ण करण्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी मार्च २०२४ ही डेडलाईन ठरविण्यात आली आहे.सध्या दिल्ली ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख तिन्ही राजधानी एक्सप्रेस दिल्लीहून मुंबईला १६ तासांत पोहोचतात.



हा कालावधी कोणत्याही परिस्थितीत १२ तासांवर आणण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर दिल्लीतून रेल्वे मंत्रालयातून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.पश्चिम रेल्वेने सुरुवातीच्या टप्प्यात वसई रोड ते सुरतपर्यंतच्या १६० किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्याचे ठरवले असून यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

या कामासाठी रेल्वेने १२० कोटींचा निधी राखून ठेवला आहे. याशिवाय दिल्लीपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यांमधून राजधानी एक्सप्रेस जाते त्या मार्गावरील रुळांच्या आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या रचनेमध्येही काही बदल प्रस्तावित आहेत.

ही सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करून राजधानी एक्सप्रेसचा सध्याचा ताशी १३० प्रति किलोमीटर असलेला वेग ताशी १६० प्रति किलोमीटरपर्यंत वाढविण्याची योजना आहे.

Rajdhani Express will become superfast

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात