Paramavir letterbomb; अनिल देशमुखांवरील कारवाईस वेळ का लावला जातोय?; दिल्ली – मुंबईत कोण – कुठे आणि कशाची चाचपणी करतोय?

विनायक ढेरे

मुंबई – नवी दिल्ली – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बनंतर ठाकरे – पवार सरकारमध्ये नुसता बैठकांचा आणि चर्चांचा सिलसिला सुरू आहे. इशारे दिले – घेतले जाताहेत… पण मूळ प्रश्न आहे, की गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाई करण्यास वेळ का लागतोय किंवा वेळ का लावला जातोय…?? यातही काही वेगळे राजकारण शिजते आहे काय…?? why sharad pawar is loosing time in taking action against anil deshmukh?

  • वास्तविक परमवीर सिंगांचा लेटरबाँम्ब फुटून १८ तास उलटून गेलेत. पत्राच्या अधिकृततेवरची शंकाही दूर झाली आहे, तरीही अनिल देशमुखांवर कारवाई करण्यास वेळ लागतो आहे किंबहुना लावला जातोय… यात नक्की कुठेतरी वेगळ्या राजकीय चाचपणीचे पाणी मुरण्याची शंका येते आहे.
  • आत्ता परमवीर सिंगांनी नुसती त्यांची बदली केली तर लेटरबाँम्ब फोडला आहे… अशा स्थितीत अनिल देशमुखांवर काही कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला तर ते आणखी एखादा लेटरबाँम्ब फोडून किंवा वेगळेच पाऊल उचलून कोणाला अडचणीत आणतील याची भीती राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना वाटते आहे काय…??
  • राष्ट्रवादीचे श्रेष्ठी त्या संभाव्य डॅमेजच्या कंट्रोलला लागले आहेत का…?? म्हणून त्यांनी मुंबई सोडून दिल्लीत अजित पवार आणि जयंत पाटील अशा मोजक्याच नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे का… अशी शंका येण्यासारखी स्थिती खुद्द राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीच उत्पन्न करून ठेवली आहे.
  • या सगळ्या राजकारणातून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करताहेत, हे उघड गुपित आहे… पण खरा प्रश्न त्या पुढचा आहे… आता एकमेकांच्या गुंत्यात अडकलेले पाय सोडवून कोणी तिसऱ्याच पायगुंत्यांत अडकवून घेण्याची चाचपणी सुरू आहे काय…? त्याचीच चर्चा मुंबई ऐवजी दिल्लीत होणार आहे का… हा खरा प्रश्न आहे…
  • नयी राह के तलाश मे हे संजय राऊतांचे ट्विट आले खरे… पण ही नयी राह काय फक्त शिवसेनाच ढुंढते आहे काय…?? की राष्ट्रवादीचे श्रेष्ठीच ही नयी राह तलाशत आहेत…?? या प्रश्नाचे देखील उत्तर मिळाले पाहिजे.
  • राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे श्रेष्ठी भले एकमेकांचा सोडून तिसऱ्या पायगुंत्यात जायला तयार असतील, पण तो तिसरा घटक या दोघांना आपल्या पायात गुंता घालू द्यायला तयार आहे का, हे पाहायला नको का… हा या प्रश्नातला खरा राजकीय अँगल आहे… आणि कोण – कुठे आणि कशाची चाचपणी करतोय, या सवालाचे उत्तर त्याच राजकीय अँगलमध्ये दडले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*