Rahul Gandhi reaches Parliament on tractor : दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाचा आवाज रस्त्यापासून ते संसदेपर्यंत ऐकू येऊ लागला आहे. विरोधक शेतकरी कायद्यांच्या मुद्यावर पावसाळी अधिवेशनात गदारोळ निर्माण करत आहेत. दरम्यान, आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधात सामील झाले. Rahul Gandhi reaches Parliament on tractor in protests against farm laws
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाचा आवाज रस्त्यापासून ते संसदेपर्यंत ऐकू येऊ लागला आहे. विरोधक शेतकरी कायद्यांच्या मुद्यावर पावसाळी अधिवेशनात गदारोळ निर्माण करत आहेत. दरम्यान, आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधात सामील झाले.
स्वत: राहुल गांधी आज ट्रॅक्टर चालवून संसद भवनात पोहोचले. राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने संसद भवनात पोहोचले होते त्यावर लाल रंगाचे बोर्ड होते. ज्यावर ‘शेतकरीविरोधी तीन काळे कायदे परत घ्या, परत घ्या.’ असे लिहिले होते.
I've brought farmers' message to Parliament. They (Govt) are suppressing voices of farmers & not letting a discussion take place in Parliament. They'll have to repeal these black laws. The entire country knows these laws favour 2-3 big businessmen: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/I2BM6CIbJR — ANI (@ANI) July 26, 2021
I've brought farmers' message to Parliament. They (Govt) are suppressing voices of farmers & not letting a discussion take place in Parliament. They'll have to repeal these black laws. The entire country knows these laws favour 2-3 big businessmen: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/I2BM6CIbJR
— ANI (@ANI) July 26, 2021
संसदेत पोहोचताना राहुल गांधींनी माध्यमांना सांगितले, “आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. हे शेतकर्यांच्या फायद्याचे नाहीत. हे काळे कायदे आहेत.” यामुळे आजही कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून संसदेत मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला आठ महिने पूर्ण होण्याच्या निमित्ताने सोमवारी जंतर-मंतर येथे महिला ‘किसान संसद’ आयोजित करणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर 22 जुलैपासून संयुक्त किसान मोर्चा जंतर-मंतर येथे तीन कृषी कायद्यांचा निषेध करत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात विविध राज्यांतील लाखो शेतकरी सहभागी झाल्याचा दावा एसकेएमने केला.
कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी ‘पेगासस प्रोजेक्ट’ अहवालावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. इस्रायली कंपनी एनएसओच्या पेगासस स्पायवेअरद्वारे 300 हून अधिक भारतीय मोबाइल फोन नंबर हॅकिंगसाठी लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. तथापि, सरकारने यापूर्वीच या प्रकरणातील विरोधकांचे सर्व आरोप नाकारले आहेत.
Rahul Gandhi reaches Parliament on tractor in protests against farm laws
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App