Punjab Election : पंजाब लोक काँग्रेसची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कॅप्टन अमरिंदर सिंग पतियाळातून लढणार

Punjab Election Punjab Lok Congress announces first list of 22 candidates, Capt Amarinder Singh to contest from Patiala

Punjab Election : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. 22 उमेदवारांपैकी दोन माझा, तीन दोआबातील आणि 17 माळवा विभागातील आहेत. पक्षाची पुढील यादी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत आठ जाट शीख आहेत. याशिवाय चार उमेदवार एससी समाजाचे, तीन ओबीसी समाजाचे, तर पाच हिंदू चेहरे आहेत. यावेळी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजप आणि शिरोमणी अकाली दल युनायटेडसोबत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने आपले 35 उमेदवार जाहीर केले आहेत. Punjab Election Punjab Lok Congress announces first list of 22 candidates, Capt Amarinder Singh to contest from Patiala


वृत्तसंस्था

चंदिगड : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. 22 उमेदवारांपैकी दोन माझा, तीन दोआबातील आणि 17 माळवा विभागातील आहेत. पक्षाची पुढील यादी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत आठ जाट शीख आहेत. याशिवाय चार उमेदवार एससी समाजाचे, तीन ओबीसी समाजाचे, तर पाच हिंदू चेहरे आहेत. यावेळी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजप आणि शिरोमणी अकाली दल युनायटेडसोबत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने आपले 35 उमेदवार जाहीर केले आहेत.

पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार, जिल्हा काँग्रेस कमिटी लुधियानाचे माजी अध्यक्ष आणि पीएलसीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जगमोहन शर्मा लुधियाना पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. अकाली दल सरकारमध्ये सहकार मंत्री सतिंदरपाल सिंह ताजपुरी यांचे पुत्र लुधियाना दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लुधियानाचे माजी वरिष्ठ उपमहापौर आणि मनसा येथील अकाली दलाचे माजी आमदार प्रेम मित्तल आत्मानगरमधून तर दमनजीत सिंग मोही यांना दाखा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अमरिंदर सिंग पटियाला येथून उतरणार आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंजाब लोक काँग्रेस या त्यांच्या नवीन राजकीय पक्षाचे नाव जाहीर केले होते. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय संघर्षानंतर अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना विजयी होऊ देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Punjab Election Punjab Lok Congress announces first list of 22 candidates, Capt Amarinder Singh to contest from Patiala

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात